श्री नाईकबा यात्रेस उत्साहाचा जल्लोष!

भविकांच्या गर्दीने बनपुरी गजबजली; आज नैवेद्याचा दिवस, उद्या पालखी सोहळा



बनपुरी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: श्री नाईकबा देवाच्या वार्षिक यात्रेस आज उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची बनपुरीत मोठी गर्दी झाली असून, चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. बैलगाड्या, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या निनादात यात्रेचा शुभारंभ झाला.

आज (ता. ३) श्री नाईकबा देवाचा नैवेद्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. उद्या (ता. ४) सकाळी भव्य पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे.

यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज

यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. जादा एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी पोलिस, ग्रामपंचायत, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा समिती यांनी विशेष तयारी केली आहे.

भाविकांचा उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे बनपुरीतले वातावरण भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.