जेईई परीक्षेत ‘ब्रिलियंट’च्या विद्यार्थ्यांचा सातारा जिल्ह्यात डंका

तेजस दाभाडे सातारा जिल्ह्यात प्रथम 



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथील विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तेजस चंद्रकांत दाभाडे याने ९९.९३ पर्सेंटाइल मिळवत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याने ब्रिलियंटच्या निकालाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

आर्यन मोहन पाटील (९९.६३), सुमितराज चंद्रकांत यादव (९९.४३) आणि विशाखा परशुराम आरेकर (९९.३९) यांनी देखील ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी केवळ कराड शाखेतूनच हा उत्तम निकाल मिळवत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अन्य विद्यार्थ्यांमध्ये व्यंकटेश अरुण जाधव (९४.००), श्रवण बापूसो पाटील (९४.००), तनिष्का गणेश जाधव (९२.२९), अमोल पोळ (९१.०७), जयराज चव्हाण (८९.४३), तृप्ती कुंभार (८८.५६), अंतरिक्ष चव्हाण (८८.००), अवधूत पाटील (८७.३८), थोरात तनिष्का भास्करराव (८६.५८) आणि विशाल कुंभार (८४.३१) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हे सर्व विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरले असून, एनआयटी, ट्रिपल आयआयटी आणि जीएफटीआय सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.

दरम्यान, दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, एनडीए, आर्किटेक्चर आणि डिफेन्स रिसर्च परीक्षांच्या तयारीसाठी एनसीईआरटी पॅटर्ननुसार ११ वीचे वर्ग एप्रिलपासून सुरू होत आहेत. तसेच, आर्यन पब्लिक स्कूल अंतर्गत ६ वी ते १० वी फाउंडेशन स्कूल सुरू असून, याचे वर्ग १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.