कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला मोठा जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, उद्या (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह कराड तालुक्यातील विंग येथे सभा घेणार आहेत. आदर्श विद्यामंदिराच्या भव्य मैदानावर त्यांच्या भाषणाने उत्साह वाढणार आहे.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही भव्य जाहीर सभा शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता होणार आहे, ज्यात अमित शाह जनतेशी संवाद साधणार आहेत.
या प्रसंगी जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या भाषणात काय मुद्दे मांडतील, याची उत्सुकता सर्वत्र आहे.