काळंबादेवी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने वाहन वितरण


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बँकिंग क्षेत्रात अद्यावत सुविधा देणारी काळंबादेवी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत प्रगतीचा आलेख चढवला असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात आपले स्थान निर्माण केले आहे. समाजातील सुशिक्षित, बेरोजगार, लघुउद्योजक व व्यावसायिकांना आर्थिक आधार देत त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे नेण्याचे कार्य ही सोसायटी करते आहे.

गुरुवार, १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सोसायटीच्या वतीने संतोष पवार यांना हुंडाई एक्सटर्न वाहन वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थापक चेअरमन रमेश घाडगे, सुरज घाडगे , डॉ. सुभाष ताईगडे, मान्याचीवडीचे सरपंच रविंद्र माने, शिंदे, जगताप, अमोल आमले, पोलीस पाटील विक्रम वरेकर, उद्योजक भगवान मोरे, तानाजी चाळके, उमेश भुलुगडे, तानाजी शिंदे, अरुण शिबे, महेश मोरे, प्रतिनिधी राजेंद्र पुजारी आणि काळंबादेवी परिवारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

काळंबादेवी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पारदर्शकता व दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून आपली विश्वासार्हता सिद्ध करत असून भविष्यातही समाजहिताचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.