शंभूराज देसाई यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट.


मुबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघात मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर मा.ना.शंभूराज देसाई यांनी मुंबई येथील मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान, शंभूराज देसाई यांनी महायुतीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याचप्रमाणे, देवेंद्र फडणवीस यांनीही पाटण मतदारसंघातील शंभूराज देसाई यांच्या विजयाबद्दल त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी दोघांमध्ये आगामी राजकीय दिशा, विकासकामे आणि मतदारसंघातील पुढील वाटचाली संदर्भात मनमोकळा संवाद झाला. या वेळी उदय सामंत, दादा भुसे आणि नीलमताई गोऱ्हे यांचीही उपस्थिती होती.