कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगाव (ता. पाटण) येथील समाजसेवक आणि राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर त्यांच्या मातोश्री श्रीमती सुमन पाटणकर (वय ७४) यांचे दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
कुंभारगाव (ता. पाटण) येथील समाजसेवक आणि राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर त्यांच्या मातोश्री श्रीमती सुमन पाटणकर (वय ७४) यांचे दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
स्वर्गीय सुमन पाटणकर या मनमिळावू स्वभावाच्या व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या म्हणून सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या निधनाने कुंभारगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे आणि परतोंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन आणि जलदान विधी रविवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता वैकुंठधाम आनंदनगर (कुंभारगाव) येथे होणार आहे