विधानसभा निवडणूक 2024: ढेबेवाडी पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संचलन


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ढेबेवाडी पोलिस ठाण्याने संवेदनशील भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष संचलन केले. या संचलनाचे आयोजन तळमावले, धामणी, काळगाव, कुंभारगाव, आणि ढेबेवाडी या गावांमध्ये करण्यात आले.

ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे API डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी रूट मार्च केला. निवडणूक कालावधीत शांतता आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांचे आवाहन आहे की नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा.

पोलीस प्रशासनाने जनतेला विनंती केली आहे की, सोशल मीडियावर कोणत्याही वादग्रस्त पोस्ट, स्टोरी, स्टेटस, किंवा डिजिटल बॅनर टाकू नयेत. असे केल्यास कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, वॉट्सअॅप समूहाचे अॅडमिनही या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या विशेष संचलनाद्वारे पोलिसांनी निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.