आनंदराव चव्हाण पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी


ढेबेवाडी : आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे सभासद शंकर शिंदे यांना धनादेश देताना चेअरमन अभिजीत पाटील. समवेत संस्थापक हिंदुराव पाटील व इतर मान्यवर.

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गरजू आणि अडचणीत असलेल्या सभासदांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत आली आहे. या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून, सभासद शंकर तुकाराम शिंदे (रा. मराठवाडी, ता. पाटण) यांच्या मुलाच्या उपचारासाठी संस्थेच्या सभासद कल्याण निधीमधून आर्थिक सहाय्य करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते शंकर शिंदे यांना धनादेश देण्यात आला. यावेळी व्हाइस चेअरमन सुभाष बाटे, संचालक जितेंद्र कुंभार, वासंती पाटील, मंद्रुळकोळे सोसायटीचे व्हाइस चेअरमन शिवाजी शिंदे, माजी सरपंच तुकाराम पाटील, वसंतराव पाटील, व्यवसथापक सुहासचंद्र पाटील, कार्यालय प्रमुख आनंदकुमार कांबळे, शाखाप्रमुख रुपेशकुमार भोई, रवींद्र माने, मेघराज धस आदी उपस्थित होते.

अभिजीत पाटील यांनी सांगितले की, संस्था नेहमीच सभासदांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत असते. नैसर्गिक आपत्ती, अपघातग्रस्त आणि जळीतग्रस्त अशा परिस्थितीत गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो.