पुणे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोथरूड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे निवडणूक विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या जनजागृती मोहिमेत जेष्ठ नागरिक, दिव्यंग मतदाराचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे एरंडवना येथील अनुसया बाई खिलारे मॉडेल स्कुल मध्ये शुक्रवारी मतदान जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात अली जेष्ठ नागरिक विद्या खरे यांचे हस्ते या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी दिव्यांग मतदार उपस्थित होते निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी विधानसभा मतदानाबाबत जनजागृती केली या वेळी "मी मतदान करणारच "असा निर्धार मतदारांनी केला यावेळी विद्या खरे म्हणाल्या की, मी 1970 पासून मतदान केंद्रात जाऊन मतदान करत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला होता विधानसभा निवडणुकीत देखील मी मतदान केंद्रात जाऊनच मतदानाचा हक्क बजावणार आहे लोकशाही बळकटीसाठी सर्वानी मी मतदान कारणच ! मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
जनजागृती मोहिमेत जेष्ठ नागरिक, दिव्यंगाचा उस्फुर्त प्रतिसाद