देसाई कारखान्याने 'इथेनॉल'निर्मितीसाठी नियोजन करावे; राज्य शासन सर्वोतोपरी पाठीशी : ना. शंभूराज देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.



पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तम नियोजनामुळे विस्तारीकरण चे दोन्ही टप्पे यशस्वी झाले असून यापुढे कारखान्याने ऊसाचे कार्यक्षेत्र वाढवून इथेनॉल निर्मिसाठी नियोजन करावे त्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी केले.

             राज्यातील शिवसेना उठावासंदर्भात बोलताना पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई म्हणाले,तीन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेच्या राजकीय उठावाच्या आमच्या भूमिकेसंदर्भात अनेक जण शासंक होते मात्र खऱ्या अर्थाने आम्ही सत्तेसाठी नव्हे,अथवा पदासाठी नव्हे तर मतदारसंघातील रखडलेल्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पाठीशी ठाम राहिलो आणि त्याचा परिणाम ही यशस्वी होऊन आजपर्यंत मतदारसंघात कधी झाला नव्हता एवढा प्रचंड विकास गेल्या अडीच वर्षात झाला याचा आपणाला अभिमान असल्याचे सांगून पाटण मतदार संघात तालुक्यातच नव्हे तर पोलीस प्रशिक्षण केंद्रा सारखे जिल्ह्यातील आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्रशिक्षण केंद्रासारखे राज्यातील पहिले यांसारखी मोठं मिठी विकास कामे करण्यात आपणाला यश मिळाले आहे आता यापुढे दौलतनगर ज्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आणि ऊस उत्पादक सभासदांचे सहकार क्षेत्रातील माहेरघर बनले आहे त्याच प्रमाणे शैक्षणिक क्षेत्राचे ही माहेर घर बनावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

            तारळी विभागासहित तालुक्यातील पाच योजनांचे १०० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी मिळावे यासाठी आपण तत्कालीन शासनाकडे सलग चार वर्षे झगडत राहिलो अखेर महायुतीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील तारळी मोरणा गुरेघर, या योजनासह एकूण पाच योजनांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच आचार संहितेपुर्वी मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थित मतदार संघातील पाच ही योजनांचे शुभारंभ घेणार आहे त्यामुळे पाटण मतदार संघातील सुमारे अडीच हजार एकर नवीन क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची घोषणा ही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी केली.

     यावेळी यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई, अध्यक्ष संजय देशमुख,डॉ.दिलीपराव चव्हाण,अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,विजय पवार,बाळासाहेब पाटील,ॲङमिलिंद पाटील,ऍड डी पी जाधव,ऍड बाबुराव नांगरे,बबनराव शिंदे,प्रकाशराव जाधव यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.