खळे, पानवळवाडी, जाधववाडी - मालदन साबळेवाडी या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून निवड.
यामध्ये मालदन येथे स्मार्ट स्कूल योजने अंतर्गत दोन नवीन जिल्हा परिषद शाळा बांधकामासाठी 30.50 लक्ष रुपये तर दोन जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी 12.90 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत तर विशेष बाब म्हणजे खळे, पानवळवाडी, जाधववाडी - मालदन साबळेवाडी हा पाणंद रस्ता म्हणून नोंद होता त्यामुळे विकास कामाला मर्यादा पडत होत्या मात्र आता या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे यापुढे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे त्यामुळे या रस्त्याच्या विकासासाठी यापुढे शासनाकडून भरीव तरतूद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही आनंददायी बाब आहे यामुळे येथील सर्व युवक मंडळे व ग्रामस्थांनी ना. शंभूराज देसाई यांचे विशेष आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे.
तसेच मालदन येथील स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 4 लाख रुपये, अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 11.25 लक्ष रुपये, व्यायाम शाळा साहित्याठी 3.50 लक्ष रुपये मंजूर केले आहेत तसेच मालदन जाधवाडी पानवळवाडी येथे रस्त्यावरील विजेसाठी 30 विद्युत खांब मंजूर केले आहेत या विकास कामाबद्दल नामदार शंभूराज देसाई यांचे सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.
सदर कामे मंजूर करण्यासाठी उपसरपंच जोतीराज काळे, सरपंच गीतांजली काळे, नितीन काळे, यशवंत काळे, सतिश काळे, पत्रकार चंद्रकांत चव्हाण यांनी या कामासंदर्भात पाठपुरावा केला.