विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रमांची गरज : उत्तमराव नांगरे


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शिक्षण सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊन समाज आणि शाळेची जवळीक वाढेल, शाळेविषयी आपुलकीचे नाते निर्माण होईल, असा विश्वास शेळकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव नांगरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाच्या वतीने सध्या शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत जि.प.शाळा शेळकेवाडी (येवती) शाळेत शिक्षण सप्ताह कार्यमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास सरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, सर्व शिक्षक उपस्थित होते.

मुख्याध्यापक उत्तमराव नांगरे यांनी महाराष्ट्र शासनाने शिक्षण सप्ताह साजरा करण्या पाठीमागील उद्दिष्टे तसेच सप्ताहामध्ये दररोज घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सदरच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणेस मदत होणार आहे. शाळा व समाज यांची जवळीकता निर्माण होवून शाळेविषयी आपुलकीचे नाते अधिक घट्ट होईल असा विश्वास दिला. पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती शिक्षकांच्या मदतीने केली. विद्यार्थी तयार करत असलेल्या शैक्षणिक साहित्याचे उपस्थितांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले. आभार उपशिक्षक युवराज तिवाटणे यांनी मानले.