जनविकास पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळकृष्ण काजारी तर व्हा.चेअरमन पदी प्रताप सपकाळ यांची बिनविरोध निवड


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
तळमावले ता.पाटण येथील जनविकास सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक अधिकारी एस. व्हि. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन पदी श्री.बाळकृष्ण लक्ष्मण काजारी व व्हा.चेअरमन पदी श्री.प्रताप रामचंद्र सपकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र काजारी यांनी व्यक्त केले. 
या वेळी चेअरमन बाळकृष्ण काजारी, व्हा.चेअरमन प्रताप सपकाळ व नवनिर्वाचित संचालक मंडळ संदीप काजारी,राजेंद्र घारे, सिताराम मोडक, नारायण घाडगे, संदीप पाटील, बबन पाटील, दिलीप यादव, सुनिल इंगवले, सुमन घागरे, सुगंधा माने यांचे सहाय्यक निबंधक अधिकारी एस. व्हि. पाटील यांनी अभिनंदन केले व संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.