ग्रामीण भागात वैधकीय अत्याधुनिक सुविधा लोकल्याणकारी आहेत : श्रीनिवास पाटील

अनुलक्ष क्लिनिकल लॅबोरेटरी आणि डिजिटल एक्सरे सेंटरचा शुभारंभ उत्साहात संपन्न. 



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले ता पाटण येथे अनुलक्ष क्लिनिकल लॅबोरेटरी आणि डिजिटल एक्सरे सेंटर या फर्मचे उदघाट्न माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
या वेळी श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले की, 
येथील लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध नाहीत. त्यांना वैधकीय सेवा मिळावी हा त्यांचा हक्क आहे, त्यांना परवडेल अशी सेवा येथे उपलब्ध झाली तर लोकांना शहरात जावे लागणार नाही. अनुलक्ष क्लिनिकल लॅबोरेटरी आणि डिजिटल एक्सरे या फर्मच्या माध्यमातून लोकांना चांगला पर्याय निर्माण झाला आहे.
पूर्वी आरोग्याच्या, शिक्षणाच्या सोयी मिळत नव्हत्या आता मात्र त्या मिळतात तरीपण नवं नवीन डिजिटल मोबाईल ही नवीन साधने आहेत या विभागात काही काळा पूर्वी सायकलवरून फिरणारे  डॉक्टर होते सध्या ते दोन चाकी, चार चाकी वरून येत आहेत. पाटण तालुक्यातील तळमावले, ढेबेवाडी हा भाग कमी जमीन असणारा व मुंबईवर अवलंबून असणारा भाग होता त्याच रूपांतर आता स्थानिक पातळीवर नव्यानं उद्योग धंदे उभे राहत आहेत याचा मला आनंद आहे आईचे नाव अनुसया व वडिलांचे नाव लक्ष्मण त्यांच्या नावाचे अनुलक्ष डिजिटल केले असे मला वाटते. तळमावले ही मोठी बाजारपेठ होत आहे त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करू नका शक्यतो पार्किंगची व्यवस्था करा आज नव्या वास्तूत अनुलक्ष क्लिनिक, डिजिटल एक्सरे सेंटरचे स्थलांतर व शुभारंभा चे उदघाटन झाले असे जाहीर करतो असे शेवटी ते बोलताना म्हणाले.

उदघाटन प्रसंगी मारुतीराव मोळावडे, आनंदराव पतसंस्थेचे अभिजित पाटील, भाष्टे सर, डॉ. रवि यादव, डॉ. बोत्रे, डॉ. सकपाळ, डॉ. सागर पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. कदम, डॉ. घराळ, डॉ. ताईंगडे, डॉ. सुपनेकर, डॉ. कुंभार, डॉ. फासे, डॉ. टकले, डॉ. गायकवाड, डॉ. नांगरे, डॉ. शिंदे, डॉ. राजे, तळमावले व्यापारी, कराड हौशी बॅडमिंटन ग्रुप, रोटरी क्लब मलकापूरचे सर्व सदस्य, मानेवाडी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ हे उपस्थित होते.

______________________________

सतरा वर्ष अनुलक्ष लॅबोरेटरी ही येथे सेवा देत आहे, इथून पुढे डिजिटल एक्सरे ची ही सेवा त्यासोबत देणार आहे. अनुलक्ष क्लिनिकल लॅबोरेटरी आणि डिजिटल एक्सरे सेंटर ही आपली विश्वासाहर्ता टिकवून लोकांना प्रामाणिक सेवा देत आहे. 

 - विनोद आमले 
______________________________