वाचनाने माणूस घडतो : आत्माराम भोसले


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

         वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्व घडते महामानवांच्या चरित्र वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार होतात व प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार व व्यायाम करावा विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची सुरुवात करावी अंधश्रद्धा बाळगू नये विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगावा असे मत मा आत्माराम भोसले यांनी व्यक्त केले आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे इयत्ता अकरावी नवागत विद्यार्थी स्वागत व इयत्ता बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते याप्रसंगी मा मनोज माने म्हणाले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्य दलात सहभागी व्हावे

 या कार्यक्रमासाठी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव मा अशोकराव थोरात ,अध्यक्ष श्री पी जी पाटील, संचालक श्री संजय थोरात ,श्री अनिल शिर्के ,श्री दिलीप पाटील ,श्री संभाजी पांढरपट्टे ,श्री आर आर पाटील, श्री धनंजय खंडागळे ,सौ राजश्री शेटे, सौ मीना धोंगडे, श्रीमती परवीन बागवान, सौ ए एस कुंभार, सौ एस डी पाटील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात इयत्ता बारावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ ए एस कुंभार यांनी केले सूत्रसंचालन सौ एस डी खंडागळे यांनी केले तर एस डी पाटील यांनी आभार मानले