सौर ऊर्जेत दिशादर्शक मान्याचीवाडीचा होणार गौरव.
पीएम सौर घर योजनेअंतर्गत आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडी गावातील लाभार्थी जेष्ठ नागरीकांचा सत्कार करताना मुख्य अभियंता सुनील पावडे, अधिक्षक अभियंता अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार अमित आदमाने, सरपंच रवींद्र माने आदी.
दिवसेंदिवस ऊर्जा उत्सर्जनाच्या माध्यमातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि वसुंधरेच्या रक्षणासाठी सौरऊर्जा निर्मीती हाच पर्याय असल्याचे मत बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी व्यक्त केले. सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या मान्याचीवाडी गावाचा विद्युत विभागाच्या वतीने गौरव करणार असल्याचेही श्री पावडे यांनी घोषित केले.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथे पी एम सौर घर योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात श्री पावडे बोलत होते. यावेळी प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार, अमित आदमाने, शाखाधिकारी धनंजय शेडे सहाय्यक अभियंता अमोल देसाई, कनिष्ठ अभियंता सागर यादव, सन्मित्र सोलर चे संचालक विजय साळुंखे प्रदीप जाधव, तळमावले शाखेचे जममित्र आदींची यावेळी उपस्थिती होती.
ऊर्जा निर्मिती करताना पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे . पर्यायाने वसुंधरेचे नुकसान होत आहे यामुळे या पुढच्या काळात सौर ऊर्जा हा एकमेव पर्याय ठरू शकतो. शासनानेही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याने गावागावातून सौर ऊर्जा निर्मितीसाठी उठाव होणे गरजेचे आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये मान्याचीवाडी गावाने मोठे पाऊल उचलले आहे या गावाने केलेल्या या दिशादर्शक कामाची माहीती. विद्युत वितरण कंपनीच्या वरीष्ठांना देऊन या गावाचा गौरव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सरपंच रवींद्र माने यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव माने यांनी स्वागत केले . आभार दिलीप गुंजाळकर यांनी मानले.
______________________________
मान्याचीवाडी हे महाराष्ट्रातील पहिले गो ग्रीन व्हिलेज
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पेपरलेस ग्रामपंचायत असलेल्या या गावातील सर्वच वीज ग्राहकांनी विद्युत विभागाच्या गो ग्रीन या योजनेचा लाभ घेऊन दोन वर्षांपासून हजारो रुपयांची बचत केली आहे. पर्यायाने पर्यावरणासाठीही हातभार लावला आहे म्हणूनच विद्युत विभागाच्या वतीने या गावाचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याची माहिती श्री पावडे यांनी दिली.
______________________________