तळमावले कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
या वर्षी जूनच्या मध्यात पावसाचे संकेत असले तरी पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे साठवण आणि खरेदीसाठी कामाला लागला आहे. 

कुंभारगाव तळमावले विभागातील बळीराजाही खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून कृषी सेवा केंद्रावर खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागला आहे.

जून मध्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बळीराजा पेरणीपूर्व शेतीची मशागत करत आहे.



यंदा पाऊस पाणी समाधानकारक होईल, या आशेने शेतकरी बी-बियाणे, खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करू लागले आहेत.