लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी साठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज कटाक्षाने व काळजीपूर्वक पार पाडावे असे आवाहन पाटण विधानसभा मतदारसंघाचे सह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान कर्मचारी यांचे प्रशिक्षणात बोलताना केले.
पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 848 मतदान कर्मचारी यांचे आडूळ येथील खाजगी मंगल कार्यालयात दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .यामध्ये पाटण तालुक्यातील विविध विभागाचे शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक यांचा समावेश आहे. सदर कर्मचारी यांची मतदान केंद्राध्यक्ष तसेच प्रथम मतदान अधिकारी म्हणून केंद्रावर नियुक्ती होणार आहे. प्रथम सत्रात तहसीलदार पाटण यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले. तर त्यांचे शंका समाधान सह निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी केले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक आडूळ येथील शाळेमधील वर्ग खोल्यात प्रत्येकी 40 ते 50 च्या गटामध्ये देण्यात आले.
पाटण मधील मतदान कर्मचारी (महिला कर्मचारी वगळता)यांची अन्य विधान सभा मतदार संघात नियुक्ती होणार आहे.त्यामुळे सदर ठिकाणी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज हे अंत्यंत पारदर्शकपणे व नियमानुसार पार पाडण्याच्या सूचना या प्रसंगी देण्यात आल्या.
तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व मतदान कर्मचारी यांनी निवडणूक कामकाज करताना स्वतःची देखील आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी मतदान कर्मचारी याना अल्पोपहार देण्यात आला व पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली. तसेच प्रशिक्षणा नंतर सर्व मतदान कर्मचारी यांची निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा देखील घेण्यात आली.
सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तहसीलदार पाटण यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे ,निवडणूक नायब तहसीलदार पंडित पाटील प्र नायब तहसीलदार महसूल श्री विलास गभाले ,सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच मंडल अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले आहे.