पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अध्यक्षते खाली पार पडला जनता दरबार. जनता दरबारात 507 अर्ज दाखल.
पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: काल पाटण मध्ये पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षते खाली आयोजित जनता दरबारास उन्हाचा कडाका असूनही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे. या जनता दरबारामध्ये 3 तासात एकूण 507 नागरिकांनी आपले अर्ज सादर केले यामध्ये काही अर्जदार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची समक्ष भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
जनता दरबारात प्राप्त झालेल्या 507 अर्जाची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना टोकण नंबर देखील देण्यात आले असून त्यानंतर विभागनिहाय सर्व अर्जाची वर्गवारी करून सदर अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाही बद्दल संबंधित अर्जदार तसेच ना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयास देखील माहिती देण्यात येणार आहे. जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जावर तातडीने सर्व संबंधित अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.
जनता दरबार व शासन आपल्या दारी या दोन्ही संकल्पना एकत्रित करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनता दरबाराच्या आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी सातारा व स्थानिक महसूल प्रशासनाचे कौतुक केले.
जनता दरबार मध्ये प्राप्त झालेल्या 507 अर्जाची नोंदणी करून त्याची विभाग निहाय वर्गवारी करून संबंधित विभागाकडे ते पुढील कार्य वाही साठी तत्काळ पाठविण्यात येणार असून अशा अर्जावर संबंधित विभागाने तातडीने कार्ये वाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी यांनी दिल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे समवेत रविराज देसाई, यशराज देसाई तसेच जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याषणी नागराजन ,अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस अधीक्षक समीर शेख , वन विभागाच्या आदिती भारद्वाज ,प्रांताधिकारी सुनील गाढे , कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे, तहसीलदार अनंत गुरव , गट विकास अधिकारी श्री गोरख शेलार, तालुका कृषी अधिकारी श्री माळवे तसेच जिल्हा स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
_______________________________
सदर जनता दरबार मध्ये अर्ज देण्यासाठी गर्दी वाढल्याने व लोकांना जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी स्वतः टेबल वर बसून काही अर्जाची नोंदणी केली तसेच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले
_______________________________
कार्यक्रम संपल्यानंतर अशाच एका दीव्यांग बांधवाला वाटप केलेली नवीन तीन चाकी सायकल व्यवस्थित चालविता येत नसल्याने त्याला पंचायत समितीच्या प्रवेशद्वार पर्यंत स्वतः पोहोच करून प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार अनंत गुरव यांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.