कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील राहत्या घराच्या अंगणात पार्किंग केलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञाताने चोरून नेली. कुंभारगांव ता पाटण येथील अतुल रमेश यादव यांची मोटरसायकल MH 50.S -6402 रंग ब्राऊन TVS ज्युपिटर घराच्या अंगणात पार्किंग केलेली 29 फेब्रुवारी मध्यरात्री चोरीला गेलेची फिर्याद ढेबेवाडी पोलीस स्टेशनला नोंद झाली असून पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे

याबाबतची अधिक माहिती अशी की कुंभारगांव ता पाटण येथील अतुल रमेश यादव यांच्या मालकीची ज्युपिटर MH 50. S- 6402 मोटारसायकल राहत्या घराच्या अंगणात हॅन्डललॉक करून पार्किंग केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या अंगणात मोटर सायकल दिसून आली नाही. यानंतर घरातील लोकांनी व गावातील सुरेश दराडे, सुमित चाळके यांचे सहकार्याने कुंभारगांव ते गलमेवाडी ते मानेगांव हा सर्व परिसर शोधा शोध केली पण मोटरसायकल मिळून आली नाही यानंतर या मोटरसायकल चोरीची फिर्याद ढेबेवाडी पोलीस स्टेशनला दिल्या वर सदर घटनेचा पंचनामा ठाण्याचे हवालदार नवनाथ कुंभार यांनी केला असून ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या API शैलजा पाटील यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ कुंभार करत आहेत.