मलकापूर शहराचा झपाट्याने होणारा विकास व नगरपरिषद अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत प्राथमिक सोयी-सुविधांमुळे मलकापूर शहरात नागरीकांच्या वास्तव्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मलकापूर नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 कोल्हापूर नाका, मलकापूर ते नांदलापूर या दरम्यानचा नवीन Singal Column 6 पदरी लेनचा उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मलकापूर नगरपरिषद हद्दीतून कराड शहरात जाणारी वाहने व कराड शहरातून बाहेर पडणारी वाहने मलकापूर शहरातील रस्त्यावरुन ये-जा करत आहेत. या कामास अंदाजे 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्याअनुषंगाने मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण, (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शिफारशीने व प्रयत्नांने खालील विकास कामे मंजूर झालेली आहेत.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24
नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मलकापूर नगरपरिषद हद्दीतील मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर रस्ता रुंदीकरण, फुटपाथ व सुशोभिकरण करणे. रु.149.00 लक्ष निधी.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना रक्कम रु.201.00 लक्ष निधी.
सहायक संचालक, नगर विकास योजना (UD-6) अंतर्गत
अ) विश्रामनगर येथील रस्ता रु.71.00 लक्ष निधी.
ब) राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते वृंदावन सिटी रस्ता रु.190.00 लक्ष निधी.
मलकापूर नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीसाठी वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत रु.100.00 लक्ष निधी.
विशेष रस्ता अनुदान अंतर्गत रु.30.00 लक्ष निधी.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रक्कम रु.29.00 लक्ष निधी.
मलकापूर लक्ष्मीनगर येथील स्मशानभूमी /दफनभूमी विस्तारीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरण करणेसाठी केंद्र शासनाच्या Ministray of Housing and Urban Affairs सन 2022-23 या आर्थिक वर्षामधील राज्यांना विशेष सहाय्य योजने अंतर्गत रु.189.00 लक्ष सहाय्य अनुदान मंजूर झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून वरील प्रमाणे एकूण रु.9.59 कोटी निधी मंजूर झाला असून काही कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत व काही कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. सदर निधी मंजूरी होणेसाठी मा.ना.एकनाथ शिंदेसो, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, केंद्रीय मंत्री मा.ना.हरदीप सिंह पुरी, आवास व शहरी मंत्री, मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा, मा.जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी सातारा, श्री.शशिकांत माळी जिल्हा नियोजन अधिकारी सातारा, श्री.अविनाश पाटील संचालक, नगररचना, पुणे महाराष्ट्र राज्य व श्री.काळे सहायक संचालक, नगररचनाकार, सातारा, सौ.पल्लवी पाटील, नगरपालिका प्रशासन अधिकारी, सातारा याकामी मलकापूरच्या मा.नगराध्यक्षा सौ.निलम येडगे, मुख्याधिकारी श्री.प्रताप कोळी, मा.सभापती बांधकाम समिती श्री.राजेंद्र यादव, मा.सभापती नियोजन विकास व शिक्षण समिती श्री.प्रशांत चांदे, मा.सभापती महिला व बालकल्याण समिती सौ.कमल कुराडे, मा.उपसभापती महिला व बालकल्याण समिती सौ.नंदा भोसले तसेच मलकापूर नगरपरिषदेचे मा.पदाधिकारी, मा.नगरसेवक व मा.नगरसेविका व नगरअभियंता श्री.योगेश गुरव, वरिष्ठ लिपिक श्री.ज्ञानदेव साळुंखे यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्व विकास कामांमुळे मलकापूर मधील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व दळण-वळणाची सुविधा सुलभ होणार आहे.