सातारा| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
असवली गावच्या सरपंच पूजा संकपाळ यांनी विविध उपक्रम व प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले आहेत. पहिल्यापासूनच त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्राची आवड आहे. टेलरिंग व्यवसाय च्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देणे त्यातून रोजगार उपलब्ध करून देणे. महिलांना बचत गटाचे महत्व पटवून देऊन जास्तीत जास्त महिलांना बचत गटात सामील करून घेऊन छोट्या छोट्या घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील दारूबंदी साठी त्यांनी विशेष लढा दिला आहे. तंटामुक्ती, सामाजिक उपक्रम तसेच शासनाच्या जनतेसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

एक सामान्य कुटुंबातील महिला व उच्चशिक्षित असल्यामुळे सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या याची दखल घेऊन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना 'महाराष्ट्राचा गौरव' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुण्याच्या पोलीस आयुक्त रोहिणी गलांडे, एस पी गिल साहेब या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार पुण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्मारक हॉलमध्ये झालेल्या समारंभात त्यांना देण्यात आला.
महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या काम पाहत आहेत.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.