सत्यवान मंडलिक यांना कालिदास सन्मान पुरस्कार



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
Helping hands welfare society तर्फे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वक्रतुंड सभागृह गणेश मंदिर संस्थान डोंबिवली* येथे संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही निवडक पुस्तकांना कालिदास सन्मान पुरस्कार देऊन लेखकांना गौरविण्यात आले. . . Helping hands welfare society तर्फे प्रतिवर्षाप्रमाने याही वर्षी संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त २०२३साली साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लेखक/कवी यांचा हृद्य सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी लेखक कवी सत्यवान मंडलिक यांना त्यांच्या ' म्हातोबाचा माळ' या पुस्तकासाठी कालिदास सन्मान २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच राज आसनोडकर (कायद्याने वागा चळवळीचे प्रणेते.) मनीष पाटील (कोमसाप ठाणे जिल्हा माजी जिल्हा कोषाध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक) या मान्यवरांसोबत चर्चासत्राचा देखील कार्यक्रम पार पडला.

सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सत्यवान मंडलिक यांना 'म्हातोबाचा माळ ' या पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच संस्थापक अध्यक्ष मा.समीर चव्हाण सर आणि सर्व टीमने वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. . यावेळी काव्य मैफिल उस्फुर्तपणे पार पडली. त्यामध्ये कवी सत्यवान मंडलिक यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून अवघेचि सभागृह भारावून सोडले.यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या आणि त्यास प्रेक्षक काव्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.