जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.

 

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत गौरव केला. डाॅ.डाकवे यांना शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किसान उत्सव दिनाचे औचित्य साधत शाल, श्रीफळ, आंब्याचे रोपटे आणि कोल्हापूर फेटा देवून सन्मान केला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत यावेळी सातारा जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे व अन्य कृषी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने या कौतुक सोहळयाचे आयोजन केले होते.

 पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी हा गौरव केला.

 दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी स्वतः रेखाटलेले कलेक्टर जितेंद्र डुडी यांचे चित्र त्यांना भेट दिले. या ‘सरप्राईज’ भेटीमुळे कलेक्टर साहेब खुष झाले. त्यांनी डाॅ.संदीप यांच्या पत्रकारितेबरोबर कला कौशल्याचेही कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॅ.डाकवे यांच्यासमवेत सौ.रेश्मा डाकवे, कु.सांची डाकवे तसेच विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी कर्मचारी उपस्थित होते.

लवकरच शेतीमित्र पुरस्काराचे वितरण शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक केले जाणार आहे.