तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शेंडेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण येथील वैशाली संतोष पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पाटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शेंडेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण येथील वैशाली संतोष पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पाटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आमदार मकरंद पाटील व संजिवराजे निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय देसाई व पाटण तालुका अध्यक्ष सागर पाटील तसेच राष्ट्रवादी पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.
पक्ष बळकटीसाठी पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहु तसेच महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीन असा विश्वास वैशाली पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
वैशाली पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पाटण तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुंभारगाव व ढेबेवाडी विभागातील महिलांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
शेंडेवाडी (कुंभारगाव) चे पोलीस पाटील संतोष पवार यांच्या वैशाली पवार या पत्नी आहेत.