के.सी.कॉलेजला नँक "B++"(2.77) मानांकन



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण व महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या त्यागातून १९६९ साली काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या संस्कार केंद्राची स्थापना झाली. दि.१६ जाने व १७ जाने २४ रोजी राष्ट्रीय पातळीवरील 'नॅक ' पीअर टीम ( त्रिसदस्यीय समिती) मूल्यांकनासाठी आपल्या महाविद्यालयात आली होती. शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ दिंगबर शिर्के साहेब, मा.कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मा सचिव सौ.शुभांगीताई गावडे, प्रशासकीय सहसचिव मा डॉ राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव मा प्राचार्य एस एम गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा कौस्तुभ गावडे आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या प्रेरणेने सर्व प्राध्यापक,विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक, माजी विद्यार्थी, संस्था परिवारातील सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी गेली वर्षभर नॅकच्या तयारीच्या कामासाठी झटत होते.या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान माजी सहसचिव अर्थ मा एस के कुंभार , माजी सहसचिव प्रशासन मा प्राचार्य आर के भोसले यांनी केलेल्या मौलिक सूचना महत्वपूर्ण ठरल्या. संस्थेचे आजी - माजी पदाधिकारी व आजिव सेवक सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे आजी माजी पदाधिकारी इ. यांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केले. आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच यश मिळाले. महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा भरत पाटील (नाना), 

मा संजय देसाई,मा प्रताप भाऊ देसाई ,मा बापुसो सावंत सर यांनी वेळोवेळी भेटी देऊन अनमोल मार्गदर्शन केले. तळमावलेचे लोकनियुक्त सरपंच मा सुरज यादव ग्रामपंचायत सदस्यांचे, ग्रामस्थ, पालक सर्वांनी नॅक तयारीसाठी भरीव योगदान दिले. माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा. राजाभाऊ माने, सचिव प्रा. अधिकराव कणसे व सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मोलाची मदत व सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभले. दि. १६ जाने, २०२४ रोजी पीअर टीमसोबत झालेल्या माजी विद्यार्थी संवाद मेळाव्यास आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपला अमूल्य वेळ देऊन मोठ्या संख्येने आजी - माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित राहिले. आपल्या उपस्थितीने आम्ही अक्षरश भारावून गेलोमाजी विद्यार्थी व वांग खोऱ्यातील सर्वच दै.पत्रकार बंधु ,संस्थेचे व कॉलेजचे हिंतचिंतक इ.ची मोलाची मदत मिळाली. महाविद्यालयाचा विकास करणे,दर्जा वाढविणे, नावारूपास आणणे ही जबाबदारी आपण सर्वजण नेटाने पार पाडत असल्याने. नँक त्रिसदस्यीय समिती मध्ये चेअरमन डॉ जम्पाला सत्या मोहन, डॉ आशा कोलाकलावरी, डॉ हेमाली देसाई यासर्वांनी प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले तसेच कॉलेज मधील प्रत्येक विभाग प्रमुखांशी सुसंवाद,आजी - माजी विद्यार्थी यांच्याशी देखील सुसंवाद केला , कॉलेजच्या ग्रंथालयाल सदिच्छा भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी आणी ग्रंथपाल यांच्याशी देखील सुसंवाद तसेच शारीरिक शिक्षण विभाग , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, दुरशिक्षण विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास क्रेंद इ.विभागास प्रत्यक्ष भेट व सुसंवाद केला आणि शेवटी या नँक त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राचार्यांकडे सुपूर्द केला.

याअहवालाच्या संर्वेक्षणानुसार कॉलेजला नँक" B++" (CGPA 2.77 ) मुल्यांकन मिळाले .