वडिलांनी ब्यांजो पार्टीत ढोल वाजवून मुलाला केला मुंबई हायकोर्टात वकील.

   

कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगांव ता पाटण येथील मान्याचीवाडी नजीक मातंग वस्ती मधील अधिक गोपाळा वायदंडे याची घरची परिस्थिती बेताचीच अत्यंत खडतर परिस्थितीत बँजो पार्टीत ढोल वाजवून मिळविलेत्या तुटपूंज्या पैशातून आपला संसार,मुलाचे शिक्षण याचा खर्च अश्या बिकट परिस्थितीतून आपल्या मुलाला शिक्षण दिले. एकुलता एक मुलगा जीवन अधिक वायदंडे मुंबई हायकोर्टात वकील झाल्याने मी समाधानी असल्याचे कृष्णाकाठ शी बोलताना अधिक वायदंडे म्हणाले. 

जीवन अधिक वायदंडे याचे प्राथमिक शिक्षण पहिले ते सातवी पर्यंतचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाळकेवाडी येथे झाले पुढील आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री लक्ष्मी देवी हायस्कुल कुंभारगांव येथे झाले त्या पुढील 11,12 वीचे शिक्षण काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले ता पाटण या ठिकाणी झाले. 

तर बारावी नंतरचे डिग्री कॉलेज एस. जी. एम. कॉलेज कराड येथे झाले तर मुंबई विद्यापीठातील बाळासाहेब आपटे लॉ कॉलेज दादर येथून कायद्याची डिग्री घेतली व पुढे मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम चालू केले. ते सध्या सिव्हिल, क्रिमिनल केसेस चालवत आहेत. या साठी जीवनला सिनियर ॲडव्होकेट श्री वल्लभ पंचपोर,पुणे व टि, जे, मेंडन (कर्नाटक) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वयाच्या 29 व्या वर्षी जीवन अधिक वायदंडे याने मुंबई हायकोर्टात वकील म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.ते सिव्हिल, क्रिमिनल केसेस चालवत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुंभारगांव परिसरात जीवनचे कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.