'श्री संतकृपा' चा विद्यार्थी प्रशांत मोरे एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
वडजाईनगर सुतारवाडी, ता. पाटण येथील प्रशांत संजय मोरे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अ राजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२२ मध्ये इतर मागास प्रवगांतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्य कर निरीक्षकपदी  निवड झाली आहे.

वडजाईनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रशांत मोरे यांचे प्राथमिक शिक्षण मान्याचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले तर घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा पॉलिटेक्निक महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी संपादन केली.

या यशाबद्दल प्रशांत मोरे यांचे श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी,प्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी संस्थेच्या इतर सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.