ना.शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभारगाव- खळे विभागात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.



            तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कुंभारगांव,गुढेकरवाडी, काढणे, खळे,शिद्रुकवाडी, मानेगांव, करपेवाडी, माटेकरवाडी,मोरेवाडी, शेंडेवाडी, गलमेवाडी आदी परिसरात राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा आणि ठाणे जिल्हा यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 3 कोटी 89 लाख 98 हजार रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते नुकतेच पार पडले. 

यावेळी बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण, पाटण बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, संचालक धनाजी गुजर, मर्चन्ट सिंडिकेट चे अध्यक्ष अनिल शिंदे, कुंभारगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण,सदस्य किशोर चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, वि, का, सेवा सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार माजी चेअरमन भिमराव चव्हाण,संचालक राजेंद्र पुजारी,रमेश यादव, शेंडेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच राहुल मोरे, जनविकास पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,व शिद्रुकवाडी चे आदर्श सरपंच बाळकृष्ण काजारी व परिसरातील सर्व कॉन्ट्रॅक्टर, ग्रामस्थ उपस्थित होते. 


    यावेळी कुंभारगांव येथे भूमिपूजना निमित्त झालेल्या समारंभात रविराज देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ दिलीपराव चव्हाण, विध्यमान उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कुंभारगांव ग्राम सचिवालय, तळ्याच्या तिन्ही बाजूला स्टेडियम टाईप पायऱ्या व्हाव्या व श्री लक्ष्मी अंबाबाई देवी परिसरातील विकासा संदर्भात काय करता येईल व बाजार तळ कॉक्र्टिकरणाची मागणी केली. 

यावेळी गुढे ता पाटण येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे 2515 योजना 2023/24 मधून 30 लाख, गूढेकरवाडी खळे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे 15 लाख, खळे मातंगवस्ती ते डूबलवाडी रस्ता खडीकरण करणे 20 लाख, खळे कवडेवाडी रस्ता सुधारणा करणे 20 लाख, शिद्रुकवाडी- काढणे ते घोरपडे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे 20 लाख, शिद्रुकवाडी मुख्य रस्ता ते मुगडेवाडी रस्त्यावर साकव बांधणे 49,98 लाख, तुपेवाडी -काढणे घारेवस्ती रस्ता सुधारणा करणे 15 लाख, मानेगाव अंतर्गत काँक्रटीकरण 15 लाख -इंजाईदेवी मंदिर रस्ता सुधारणा करणे डोंगरी विकास आराखडा सन 2223-10लाख, करपेवाडी ते साईबाबा मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 2515-20 लाख, कुंभारगांव ग्रामपंचायत जवळील संरक्षण भिंत बांधणे 30 लाख, मोरेवाडी -प्रजीम 54 रस्ता ग्रामा 333 भाग मान्याचीवाडी पर्यंत अर्थसंकल्प 2023-24-;30 लाख, माटेकरवाडी ते चिखलेवाडी -जंगलीमठ रस्ता सुधारणा करणे 40 लाख, चव्हाणवाडी- चिखलेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा करणे 15 लाख, शेंडेवाडी -पवारवस्ती येथे स्मशानभूमी रस्ता एक किलोमीटर सुधारणा करणे 25 लाख, गलमेवाडी येथील ओढ्यावर साकव बांधणे 2516 मधून 35 लाख या सर्व विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.