कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: येळगाव ता.कराड येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने "संघर्षाला शिवछत्रपती प्रतिष्ठान" ची साथ हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमात एका कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी व एका पेशंटला वैद्यकीय उपचारांकरीता आर्थिक मदत करण्यात येत आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान मागील ५ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प, कोरोना काळात गोरगरीब कुटुंबांना संसारोपयोगी अन्न धान्य किट, मास्क, sanitizer, ऑक्सीजन मशीन, विविध स्पर्धा, शिवजयंती इत्यादी सामाजिक उपक्रम राबवले जातात.
एक मतिमंद मुलगा आणि त्याची आई संघर्षमय जीवन व्यथित करत आहेत. त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून एक शेळी खरेदी करण्याकरिता रुपये २५०००/- रोख मदत करण्यात आली. त्याचबरोबर आणखी एक ३१ वर्षांचा तरुण गेली ४ वर्षे किडनी फेल्युअर मुळे डायलिसिस करत आहे. त्याला औषोधोपचारांकरिता रुपये १००००/- रोख रक्कम देण्यात आली. असे दोघांना एकूण ३५०००/- रुपयांचे वाटप करण्यात केले.
या उपक्रमासाठी नवी मुंबई येथील sandoz मित्र परिवाराने सढळ हस्ते तीस हजार रुपये व शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार रुपये गोळा करून दिले.
या उपक्रमा मुळे दोन्ही कुटुंबाना आर्थिक मदत झाली. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात राबवण्यात येणार आहेत. असे शिवछत्रपती प्रतिष्ठान व sandoz मित्र परिवार नवी मुंबई यांच्या वतीने सांगण्यात आले.