कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
चाळकेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थ, मित्र मंडळ यांनी एकत्र येत एक सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . गावातील गरीब कुटुंबाला उपचारासाठी केली आर्थिक मदत.
चाळकेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थ, मित्र मंडळ यांनी एकत्र येत एक सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . गावातील गरीब कुटुंबाला उपचारासाठी केली आर्थिक मदत.
भैरवनाथ मंदिरचे पुजारी सदाशिव चाळके यांना काही दिवसापूर्वी ब्रेन हॅमरेज स्ट्रोक आला होता त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते परंतु त्यांची आर्थिक परस्थिती अत्यंत बिकट असलेने पुढील उपचार होणे शक्य नव्हते. अशा वेळी चाळकेवाडी येथील ग्रामस्थ, मित्र मंडळ यांनी एकत्र येत या कुटूंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करत सुमारे दोन लाख रुपये उपचारासाठी मदत म्हणून देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत या कुटूंबाला आर्थिक मदत केल्याने सर्व स्तरातून ग्रामस्थांचे व येथील मित्र मंडळाचे कौतुक होत आहे.