मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांनी सुरु केले उपोषण स्थगित करावे. त्याचबरोबर आपल्या तब्यतेची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. मराठा आरक्षणबाबत आत्तापर्यंत शासनाकडून 26 बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजातील बांधवानींही शांतता पाळून सहकार्य करावे. असे आवानही श्री. देसाई यांनी केले.
मराठा आरक्षणबाबत राज्य शासन सकारात्मक आंदोलकांनी शांतता राखावी : पालकमंत्री शंभूराज देसाई