कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तारळे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील काका यांची जिल्हा परिषद शाळा तारळेच्या शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी सौ दिपाली समाधान उंडाळे यांची निवड करण्यात आली.

अभिजित पाटील हे ना. शंभूराज देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या वेळी जिल्हा परिषद केंद्र तारळे शाळे मार्फत त्यांचा व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत सत्कार केला.
या वेळी बोलताना अभिजीत पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे व शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
त्यांच्या या निवडी बद्दल विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.