श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण पतसंस्थेचा स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.



कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रेमलाकाकी ग्रा.बि.शेती सह पतसंस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे शुभ हस्ते  करण्यात झाले.

या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला या वेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या कामकाजा बाबत व आजअखेर संस्था 'अ'वर्ग व थकबाकी 0 टक्के असलेबाबत समाधान व्यक्त करत संस्थेचे चेअरमन, कर्मचारी यांचे कौतुक केले. या वेळी श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण संस्था भविष्यात उज्ज्वल यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. यानंतर हिंदुराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे चेअरमन राजेंद्र चव्हाण यांनी केली या वेळी बोलताना ते म्हणाले श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण ग्रा, बि, शेती सह, संस्थेच्या, पाणी वापर संस्था, मच्छी व्यवसाय संस्था अश्या एकूण 3 संलग्न संस्था आहेत. हि संस्था स्थापने पासून 'अ 'वर्ग प्राप्त आहे. मच्छी व्यवसाय संस्था 2006,व श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण संस्था 2007 साली स्थापन झाली या संस्थेचे सभासद 2011 आहेत.संस्थेने वाहन कर्ज , सोने तारण कर्ज व इतर स्थावर तारण कर्ज अश्या विविध योजना नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. तसेच संस्था स्थापनेपासून आजअखेर 'अ 'वर्ग प्राप्त असून संस्थेची थकबाकी 0 टक्के आहे.        



 या वेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन राजेंद्र चव्हाण, राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रातिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील बापू, लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण, सातारा जि.प.चे माजी अर्थ, शिक्षण सभापती संजय देसाई, इंद्रजित चव्हाण, कुंभारगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र पाटील, अधिकराव चव्हाण, संभाजी चव्हाण, जयवंत चव्हाण, संस्थेचे संचालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

या समारंभाचे सूत्रसंचलन आनंदराव चव्हाण यांनी केले तर आभार वायचळ सर यांनी मानले.