तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथे किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एकजण जखमी झाल्याचे समजते. या बाबत ढेबेवाडी पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की कुंभारगांव ता पाटण येथील किशोर रत्नाकर सांगावकर (वय वर्षे 34) व संदीप सुरेश माने मान्याचीवाडी यांचे किरकोळ कारणावरून सोमवारी सायंकाळी तळमावले येथे भांडण झाले या वेळी किशोर सागांवकर याने संदीप माने यास शिवीगाळ करत हाताने धक्का बुक्की करत खिशातुन चाकू काढून संदीप मानेच्या पोटात चाकू भोकसून जखमी केले. जखमी संदीप माने यास उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

या बाबतची फिर्याद साई संजय चाळके यांनी ढेबेवाडी पोलीस स्टेशनला दिली असून ढेबेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी किशोर रत्नाकर सांगावकर यास गु,र,नं 176/2023 भा, र, वि, स, कलम 326, 323,504 नुसार आज अटक केली असून पुढील तपास ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API अभिजित चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार व्हि, सि, सपकाळ करीत आहेत.