डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘तात्या’ पुस्तकाचे रविवारी 1 ऑक्टोबर ला लोकार्पण


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या वडिलांच्या विषयी लिहलेल्या 'तात्या' या पुस्तकाचे लोकार्पण रविवार दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. 

डाॅ.संदीप डाकवे यांचे वडील स्व.राजाराम डाकवे यांचे 12 सप्टेंबर 2022 रोजी आकस्मिक निधन झाले. राजाराम डाकवे (तात्या) यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे होते. अनेक कार्यात ते नेहमी अग्रभागी असत. कुटूंब, शेती, प्राणी यांच्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते.

पुस्तकाला सुप्रसिध्द व्याख्याते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांची प्रस्तावना लाभली आहे. मुखपृष्ठ व आतील रंगीत पानांची मांडणी बाळासाहेब कचरे यांनी केली आहे. 

राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, साहित्य पुरस्कार, भित्तीचित्र काव्य प्रदर्शन, स्व.राजाराम डाकवे पारितोषिक आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले. 

स्पंदन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तक लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन डाकवे परिवाराने केले आहे. या पुस्तकाची मूळ किंमत 150 रुपये असून प्रकाशनपूर्व सवलतीत पुस्तकाची किंमत पोस्टेज शुल्कासह 200 रुपये असणार आहे. घरपोच पुस्तक हवे असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 9764061633 यावर संपर्क करण्याचे आवाहन पुस्तकाचे लेखक डॉ. संदीप डाकवे यांनी केले आहे.

_______________________________
पुस्तकात क्युआर कोडचा समावेश :
तात्यांच्या जीवनातील काही प्रसंग व्हिडीओ रुपाने उपलब्ध आहेत. या व्हिडीओंची लिंक तयार करुन ते क्यु आर कोडच्या माध्यमातून पुस्तकात समाविष्ट केले आहेत. या क्युआर कोडवर मोबाईल धरल्यावर ते व्हिडीओ आपल्याला पाहता येणार आहे. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.
_______________________________