शिराळा तालुक्यातील भूउत्खनन सदृश्य परिस्थिती असणाऱ्या मिरुखेवाडी, कोकणेवाडी,भाष्टेवस्ती सह अन्य ठिकाणच्या लोकांनी सतर्क रहावे,प्रशासन सर्व उपायोजनासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्त यांच्यासह या विभागातील आणि सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना कायम स्वरूपी व्हावी. यासाठी निधी उपलब्ध करून चर खुदाई करू, तसेच या ठिकाण चे अन्य असणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केले.
शिराळा तालुक्यातील भूउत्खननाचा धोका असणाऱ्या मिरुखेवाडी, कोकणेवाडी या गावांना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी भेटी दिल्या. तेथील लोकांशी संवाद साधला व अडचणी समजावून घेतल्या व प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख, माजी जि. प सदस्य रणधीर नाईक, उपवन सरक्षक प्रादेशिक अधिकारी निता कट्टे,सहाय्यक वन अधिकारी अजित कुमार साजणे, विभागीय वन अधिकारी काळे,माजी सभापती हणमंतराव पाटील,विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक, पुनर्वसन अधिकारी उमेश पोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार शामलाताई खोत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले , मिरुखेवाडी, कोकणेवाडी गावाला भूउत्खननाचा धोका असल्याने प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जाईल. बचाव साहित्य उपलब्ध उपलब्ध करू देऊ.सॅटॅलाइट फोनची व्यवस्था केली जाईल.पावसाळ्यामध्ये होणारी अडचण लक्षात घेऊन तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू.खुंदलापूर धनगरवाडा कोअर जोन मधून कमी करण्याबाबत शासनाकडे असणारा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देऊ. मणदूर धनगरवाडा येथील जमिनी चा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून तो प्रश्न मार्गी लावू.
शिवाजीराव नाईक म्हणाले प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न गेली 25 वर्षापासून प्रलंबित आहेत.सातत्याने पाठपुरावा केला जातो परंतु ठोस उपाय योजना होत नाहीत.या ठिकाणच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
सत्यजित देशमुख म्हणाले , खुंदलापूर, धनगरवाडा गावातील लोकांनी सामूहिक निर्णय घेऊन स्थलांतर न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा कोअर झोन चा शेरा काढून लोकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा देण्यात याव्यात.मणदूरसह डोंगर कपाऱ्यामध्ये असणाऱ्या सर्वच गावांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात होत आहे.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात.
मणदूर सरपंच शोभाताई माने,चांदोली वन अधिकारी गणेश पाटोळे,चांदोली वन क्षेत्रपाल नंदकुमार नलावडे, राम माने, वसंत पाटील,नथुराम लोहार,सावळा पाटील,हिंदुराव नांगरे, नाना पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी या विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.