बनपुरी गावात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्यात चार शेळया ठार

 वनविभागाने तातडीने बिबट्या चा बंदोबस्त करावा अन्यथा जनावरासह वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा: ग्रामस्थांचा इशारा

सणबुर | प्रमोद पाटील 

 शुक्रवारी गावा मध्ये शिरून शेळी ठार केल्याची घटना ताजी असतानाच  दोनच दिवसा नंतर रविवारी रात्री पुन्हा बिबट्याने गावामध्ये शिरून तीन शेळया ठार केल्याची घटना बनपुरी ता पाटण येथे घडली. शुक्रवारी या परिसरात तीन बिबट्याची पिल्ले आढळल्याने परिसरात बिबट्याचा रहीवास असल्याचे निदर्शनास येत असुन दोनच दिवसांमध्ये  पुन्हा  गावात शिरून बिबट्या ने हल्ला करून शेळ्या ठार केल्याने  परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन शेतक-यांनी घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिका-याला बिबट्या चा बंदोबस्त करा अन्यथा जनावरासह वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढु असा इशारा दिला. 

        बनपुरी ता.पाटण येथील शेतकरी  अनिल कृष्णराव पाटील यांच्या जनावरांच्या शेडा मध्ये रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून त्यांच्या तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे  दोन दिवसांमध्ये पुन्हा बिबट्याने मानवी वस्तीमध्ये घुसून तीन शेळ्या ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याच्या सातत्याने होना-या पाळीव प्राण्यावरील हल्याबाबत  वन विभागाला वारंवार सांगून सुद्धा याकडे कानाडोळा केला जात असून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत .त्यामुळे वनविभागा बद्दल शेतक-यामध्ये मोठा असंतोष  निर्माण झाला आहे.चार दिवसांपूर्वी वन  विभागाच्या अधिकाऱ्यांना बनपुरी  परिसरामध्ये असणाऱ्या खोकट्याचा माळ मध्ये तीन बिबट्यांची पिल्ली दाखवली त्यामुळे या परिसरातील बिबट्याचा वावर अधोरेखित होत आहे .या परीसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्या कडुन अनेक वेळा हल्ले झाले आहेत या मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतक-याचे पशुधन नष्ट होत असताना सुद्धा यावर या अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही  या परिसरामध्ये बिबट्याचा असणाऱ्या वावरामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्याची सुद्धा भितीचे वाटू लागली आहे.आम्ही शेती करावी की नाही? शेतक-यांनी जगाव कस ? असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


                    गावातील भयग्रस्त ग्रामस्थ 

    त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या परिसरात असणाऱ्या बिबट्याचा सापळा लावून  बंदोबस्त करावा अशी  ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 

---------------------------------------------------------------------

बनपुरी परिसरामध्ये  बिबट्यांची संख्या वाढलेली असुन शेतक-याचे जीवनमान धोक्यात आले आहे  बिबट्यांना सापळा लावून वन विभागाने जंगलामध्ये सोडून द्यावे अन्यथा बनपुरी ग्रामस्थ आपल्या जनावरांसह व शेळ्या घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढातील .

                 अविनाश पाटील

          प्रगतशील शेतकरी बनपुरी.

  ------------------------------------------------------------------------