शेती मित्र अशोकराव थोरात राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने सन्मानित.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनच्यावतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 टेंभू तालुका कराड येथे नुकताच संपन्न झाला यामध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष,श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव, शेतीमित्र अशोकराव थोरात यांना सातारा लोकसभा मतदार संघ व सिक्कीमचे राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन नुकताच प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले थोर विचारवंतांचे जागरण,त्यांचे विचारांचे मंथन, त्यांचे विचारांचे चिंतन होणे गरजेचे आहे,ते आज या ठिकाणी इंद्रधनु फाउंडेशन व ग्रामस्थांचे वतीने झाले. सुधारणेचे विचार कृतीतून मांडले ते आगरकर.त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने मी कृतकृत्य झालो असे कृतज्ञतापूर्वक त्यांनी सांगितले.

       या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव प्रकाश पाटील होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार विजय पवार, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू गावचे सरपंच युवराज भोईटे आदी मान्यवर,  गोपाळ गणेश आगरकर विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच श्री मळाई देवी शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, कराड पत्रकार संघाचे पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.