नांदगाव येथे आगळी वेगळी वटपौर्णिमा....


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
नांदगाव तालुका कराड येथील शहीद भगतसिंग मित्रमंडळ व हिरकणी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेचे औचित्य आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली त्यामध्ये स्मशानभूमी परिसरात वटवृक्षारोपण करण्यात आले. 

नांदगावचे उपसरपंच अधिकराव पाटील, निवृत्त पोलीस अशोक पाटील, सुभाष माटेकर या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

याप्रसंगी बोलतांंना अधिकराव पाटील म्हणाले, " ग्रुपने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही पर्यावरण पूरक महत्त्वाची गरज बनली आहे. हे लक्षात घेऊन वडाच्या झाडाचे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. हे झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देते. त्यामुळे अशा उपयुक्त झाडांची अधिकाधीक लागवड समाजकार्याच्या माध्यमातून व्हावी. " अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शरद तांबवेकर यांनी आपल्या मनोगतातून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले. अवधूत तांबवेकर यांनी प्रास्ताविक केले. कुलदीप शिनगारे यांनी आभार व्यक्त केले .

याप्रसंगी दत्तात्रय तांबे, तनिष्क पोतदार,युवराज पाचंगे, यश तांबवेकर, श्रेयस तांबवेकर व हिरकणी महिला बचत गटाच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.