श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या उज्वल यशाची परंपरा कायम..

विज्ञान शाखेचा 100% निकाल .



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेज चा इ. 12 वी विज्ञान शाखेच्या उज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.. या वर्षी देखील विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे.

साळुंखे स्नेहा विनोद ( 81%) , पाटील प्रणाली रामचंद्र (80.50%) , काळे सानिका अधिकराव (77.33%) , थोरात आसावरी अण्णसो (76.50%) , शिरसट पौर्णिमा आनंदा (76%) तसेच 75 टक्के विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये गुण प्राप्त केले आहेत तर 25 टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.

या वेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषा जोहरी, संस्थेचे सेक्रेटरी प्रसून जोहरी सर, संचालिका प्राजक्ता जोहरी, प्राचार्या पुष्पा पाटील यांनी केले. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.