विहिरीत गाडी कोसळलेल्या चालकाचा मृतदेह सापडला.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड-पाटण राज्यमार्गावर काल दि.27 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विहे गावच्या हद्दीतील विहिरीत गाडी कोसळली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अपघातातील चालकाचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी सापडला आहे. संभाजी कृष्णा पवार (वय ५०, रा. मल्हारपेठ) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास क्रुझर जीप विहिरीत कोसळली होती. स्थानिक नागरिक व क्रेनच्या साह्याने जीप बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र यावेळी कोणीही सापडले नव्हते. अंधार व पाऊस असल्याने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बचाव कार्य व शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेण्यात आल्यानंतर सकाळी ७:३० वाजता गाडी चालक संभाजी पवार यांचा मृतदेह मिळून आला आहे.