ब्रिलियंट कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा जे ई ई मेन परीक्षेत जिल्ह्यात डंका


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड च्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत अतिशय उत्तुंग यश संपादित केले आहे. 

  उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी (फक्त कराड येथील एकाच शाखेतून) पुढील प्रमाणे अतिशय घवघवीत यश संपादित केले आहे. कल्पेश पाटील 99. 872 पर्सेन्टाइल (खुला प्रवर्ग), आशिष दोन्थ 99.742 पर्सेन्टाइल (ओबीसी), स्वराज जाधव 98.759 पर्सेन्टाइल (ईडब्ल्यूएस), रोहित बनकर 98. 974पर्सेन्टाइल (खुला प्रवर्ग), श्रेया पाटील 97.822 पर्सेन्टाइल (खुला प्रवर्ग), प्रणव खोंडे 97.970 पर्सेन्टाइल (एस सी), अथर्व गवळी 96.790 पर्सेन्टाइल (ओबीसी), कांचन बोचरे ९5.६९3 पर्सेन्टाइल (ओबीसी) विश्वदीप सुतार 94.697पर्सेन्टाइल (ओबीसी), सफा मुल्ला 92. 667 पर्सेन्टाइल(ओबीसी), वरद घोलप 91.684 पर्सेन्टाइल (ईडब्ल्यूएस), आयुष मुळे 90.683 पर्सेन्टाइल (ओबीसी), प्रतीक कारंडे 89.667पर्सेन्टाइल (ओबीसी), ओंकार यादव 87. 652 पर्सेन्टाइल (ईडब्ल्यूएस), अवधूत सपकाळ 74.69 पर्सेन्टाइल(ओबीसी)  ,स्नेहल चव्हाण 70.647 पर्सेन्टाइल (एस सी). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. 

या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्सड च्या तयारीसाठी देखील दररोज वर्ग सुरु आहेत. जेईई ॲडव्हान्सड ची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आय आय टी मध्ये प्रवेश मिळवून देणारी ही कराड मधील एकमेव अकॅडमी आहे. या कॉलेज चे मागील शैक्षणिक वर्षी जेईई ॲडव्हान्सड पास होऊन 7 विद्यार्थी आयआयटी मध्ये प्रवेशित आहेत कारण जेईई ॲडव्हान्सड चे कराड मध्ये केवळ याच ठिकाणी अध्यापन चालते.  

जेईई मेन्स व ॲडव्हान्सड साठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्टाफ, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी 11 वी पासूनच नियमित अध्यापन , दररोज चालणारा 5 ते 6 तास स्टडी व डाउट सेशन, नियमित टेस्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या ई. मुळे केवळ ब्रिलियंट चे विद्यार्थी एवढे उत्तुंग यश संपादित करू शकत आहेत. 

   या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खात्रीशीर पायाभरणीसाठी 8 वी ते 10 वी ब्रिलियंट पब्लिक स्कूल, कराड ची सुरुवात झाली असून पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद असून मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत, तसेच 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट विकेंड फाऊंडेशन ची सोय देखील आहे.

लवकरच कॉलेज व स्कूल चे स्वतः च्या जागेत स्थलांतर होत आहे 8 वी ते 12 वी च्या वर्गासाठी प्रवेश सुरु असून पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, निकालाची परंपरा हमखास असणाऱ्या जिल्ह्यातील या अकॅडमी , पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.