पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर.

कुंभारागाव, काढणे, काळगांव सह विविध विभागातील विकास कामांसाठी भरीव तरतुद.



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या अनेक गावांतील पोहोच रस्ते,अंतर्गत रस्ते यांची अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली होती. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी तातडीने भरीव निधीची गरज असल्याने राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस करत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची मागणी केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 241 गावांतील विविध विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे. 

या वेळी कुंभारगांव विभागात ही विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे. कुंभारगांव विभागामध्ये चव्हाणवाडी चिखलेवाडी अंतर्गत रस्ता, शेंडेवाडी पवारवाडी रस्ता, माटेकरवाडी ते चिखलेवाडी जंगली महाराज मठ रस्ता सुधारणा करणे, गलमेवाडी ओढ्यावर साकव, गलमेवाडी रस्ता काँक्रिटीकरण, शेंडेवाडी रस्ता काँक्रीटीकरण, चाळकेवाडी रस्ता, वरेकरवाडी रस्ता, गलमेवाडी रस्ता (हारुगडे वस्ती) कुंभारगांव अंतर्गत रस्ता, कुंभारगांव संरक्षण भिंत, मानेगाव अंतर्गत रस्ता, मानेगाव इंजाई देवी रस्ता अश्या विविध कामांसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल ऐरोली विधानसभा प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी ना.देेसाई यांचे विशेष आभार मानले. तसेच कुंभारगांव विभागातील ग्रामस्थांनी ही आभार मानले.

खळे, काढणे विभागात ही ना. देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून काढणे बौद्ध वस्ती अंतर्गत खडीकर, डांबरीकरण, तुपेवाडी काढणे घारे वस्ती रस्ता सुधारणा, खळे मातंग वस्ती ते डुबलवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण, गूढेकरवाडी खळे अंतर्गत रस्ता सुधारणा, खळे ते कवडे वस्ती रस्ता सुधारणा, कर्पेवाडी ते साईबाबा मंदिर मानेगाव रस्ता डांबरीकरण,काजा रवाडी,शिद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा आश्या विविध कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

काळगांव विभागात काळगांव बौद्ध वस्ती पाटील वस्ती ओढ्या लगत संरक्षण भिंत, काळगांव मळ्याचीवाडी पोहच रस्ता उर्वरित खडीकरण, डांबरीकरण रस्ता, काळगांव मुस्लिम वस्ती दफन भूमी रस्ता सुधारणा कुठरे अंतर्गत बबन पाटील यांचे घराकडे रस्ता धामणी सोसायटी ते चर्मकार वस्ती रस्ता, मस्करवाडी काळगांव अंतर्गत रस्ता सुधारणा, श्री भराडी देवी मंदिर रस्ता सुधारणा, वाझोली जि.प शाळा ते मोरे वस्ती रस्ता सुधारणा,गुढे अंतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.

ढेबेवाडी विभागात मंद्रुळकोळे कदम आवाड पोहच रस्ता,भोसगाव मुख्य रस्त्यावर साकव सह सुधारणा, मराठवाडी स्मशान भूमी पोहच रस्ता,बनपुरी स्मशान भूमी रस्ता सुधारणा, साबळेवाडी ते शेजवळवाडी रस्ता सुधारणा, माईगडे वाडी जिंती ते दिसले आवाड रस्ता सुधारणा, हौदाची वाडी जिंती रस्ता सुधारणा आशा विविध प्रकारच्या विकास कामांसाठी निधी मंजूर केल्या असल्याचे पत्रकात म्हणले आहे.

 सणबूर विभागात सळवे मान्याचीवाडी मंदिर रस्ता सुधारणा, वरपेवाडी जानाई मंदिर रस्ता सुधारना,रुवले स्मशान भूमी रस्ता खडीकरण, डांबरीकरण, उधावने स्मशान भूमी रस्ता सुधारणा, आंबवडे खुर्द कलेश्वर मंदिर ते रुवले फाटा रस्ता सुधारणा या साठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगितली आहे.

 या सह पाटण तालुक्यातील विविध २४१ गावातील पायाभूत सुविधांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले आहे.