पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 18 जागांसाठी 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाकडून 29 तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या देसाई गटाकडून 31 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान हमाल , मापाडी मतदारसंघातून पाटणकर गटाच्या आनंदराव पवार यांचा केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तांत्रिक बाबींनंतर त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानले जात असल्याने पाटणकर गटाने विजयाची सलामी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाजार समितीसाठी सोसायटी मतदारसंघातून सत्ताधारी पाटणकर गटाकडून ः- (सर्वसाधारण) अमर पाटील, झुंजार पाटील, सुभाष पाटील, दत्तात्रय कदम, चंद्रशेखर मोरे, अभिजीत जाधव, दादासो जगदाळे, सुभाषराव पवार, महेंद्र मगर, महिला प्रतिनिधीमधून रेखा पाटील , लतिका साळुंखे , वंदना सावंत.(इतर मागासवर्ग)ः- उत्तम कदम, (भटक्या विमुक्त जाती) ः- जगन्नाथ शेळके, (ग्रामपंचायत सर्वसाधारण) ः- मोहनराव पाटील, प्रमोद देशमुख, दत्तात्रय कदम, सचिन माने, सिताराम मोरे, महेंद्र मगर, (अनुसूचित जाती)ः- आनंदा डुबल, उत्तम पवार. (आर्थिक दृष्ट्या दुर्बल) ः- सिताराम मोरे, सचिन माने, संदीप पाटील. (अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी) अरविंद पाटील, बाळासो महाजन, निखिल लाहोटी, (हमाल व तोलारी प्रतिनिधी)ः- आनंदराव पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तांत्रिक बाबी पूर्ततेनंतर त्यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे.
ना. देसाई गटाकडून सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून ः- संग्राम मोकाशी, मानसिंग चव्हाण, विकास गोडांबे, मधुकर सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, मारुती जाधव, दादासो जाधव, अमोल जगताप, रावसाहेब चव्हाण, (महिला प्रतिनिधी) ः- वैशाली शिंदे, विमल गव्हाणे, मंगल पाटील, जयश्री पवार, (इतर मागासवर्ग) ः- नितीन यादव, पांडुरंग शिरवाडकर. (भटक्या विमुक्त जाती) ः- धनाजी गुजर, रावसाहेब चव्हाण, (ग्रामपंचायत सर्वसाधारण) मनोज पाटील, राजाराम घाडगे, जोतीराम काळे, समीर भोसले, (अनुसूचित जाती) बबन भिसे, सिद्धार्थ गायकवाड, (आर्थिकदृष्ट्या दुर्बल)ः- मधुकर देसाई, गोरख चव्हाण, अरुण जाधव, (अनुज्ञप्ती धारक व अडते प्रतिनिधी) ः- सचिन वाघडोळे, अविनाश नाझरे, अरुण जाधव,
पाटण बाजार समितीसाठी 18 जागा निवडून द्यायच्या असून 4260 इतके एकूण मतदार आहेत. बुधवारी 5 एप्रिलला अर्जांची छाननी तर दि. 6 एप्रिल ते दि. 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान व त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पाटण येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड यांनी दिली.