मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा: मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि मुंबई महापालिकेच्यावतीने चेंबूरमधील घाटले गणेश विसर्जन तलावाच्या नवीन प्रवेशद्वार कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी चेंबूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश फातर्पेकर,महिला उपविभाग संघटिका सुलभा पत्याने,शाखाप्रमुख उमेश करकेरा,महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे, समाजसेविका मिनाक्षी अनिल पाटणकर,कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, माजी शाखा संघटीका वैशाली कदम,अनिता महाडिक,घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टचे पदाधिकारी जगदीश पाटील, अशोक पाटील,राजु पाटील, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितले, मी आणि पाटणकर आम्ही दोघे लोकांच्या हितासाठी वाट्टेल तिथून निधी उपलब्ध करून देणार पण कुणाचे काम होणार नाही असे म्हणणार नाही. तसेच अनिल पाटणकर म्हणाले की,माझे कुटुंब,माझी जबाबदारी म्हणजेच आम्ही आणि आमचा मतदारसंघ हा आमचे कुटुंब असून सर्वतोपरी जबाबदारी पेलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.तरी या विसर्जन तलावाच्या या नवीन प्रवेशद्वारामुळे आता या तलावाच्या संपूर्ण कामावर जणू कळस बसविल्यासारखे झाले आहे.