जखिणवाडी, नांदलापूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अजित (काका) थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
नुकत्याच पार पडलेल्या जखिणवाडी विकास सेवा सोसायटी जखिणवाडी, नांदलापूरच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ यांचे नेतृत्वाखालील अजित काका थोरात व पी.जी. पाटील (अण्णा) यांचे रयत विकास पॅनलने 13/0 अशी नेत्रदीपक कामगिरी केली.

     सर्व नूतन संचालकांचा मळाई ग्रुपच्या वतीने नुकताच सत्कार संपन्न झाला.   चेअरमन व व्हा.चेअरमन निवडी निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

      चेअरमनपदी  अजित (काका) थोरात यांची तर व्हाईस चेअरमनपदी  तानाजी पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. श्री मळाई ग्रुप, सोसायटीचे सर्व सदस्य शेतकरी व ग्रामस्थांच्या  वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

       नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देताना श्री मळाई ग्रुप प्रमुख, शेती मित्र मा. अशोकराव थोरात म्हणाले शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवनिर्वाचित चेअरमन व सर्व संचालक मंडळांनी सदैव सहकार्य करावे, शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, त्याचबरोबर अल्प दरात शेतीची कामे,कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करून शासकीय कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम एकमुखी करावे असे आवाहन केले.

           कार्यक्रमास पी.जी. पाटील,पंढरीनाथ पाटील, आनंदराव पाटील, माणिक नलवडे, अजित थोरात(काका),तानाजी पाटील, नाना पवार, रामचंद्र पाटील, लता पाटील(नलवडे ) ,साधना विटुळे, तुळशीराम शिर्के, आत्माराम बुधे, निवडणूक निर्णय अधिकारी भारत काकडे, आर.एस. सूर्यवंशी, विश्वास निकम,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.