स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दर्जेदार सहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सन 2021 व 2022 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्य कलाकृती यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, चारोळीसंग्रह, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र आत्मचरित्र व संकीर्ण विभागातील साहित्य कलाकृतींचा यामध्ये समावेश केला जाईल. साहित्य पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र परीक्षक समिती नेमली आहे.

विजेत्या कवी, लेखकाला राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कारासाठी प्रस्तावासोबत आपल्या साहित्य कलाकृतीच्या तीन प्रती, दोन आयडेंटी फोटो, अल्प परिचय पाठवावा. पाठवलेल्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा मजूकर लिहू नये. .

ट्रस्टच्यावतीने यापूर्वी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, वार्तांकन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

तरी सदर पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव बुधवार दि.31 मे, 2023 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने आपल्या साहित्य कलाकृती पाठवाव्यात असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांनी केले आहे.