राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम नागरिक घडविण्याचे काम होते आणि श्रमाला महत्व देखील प्राप्त होते : सारंग बाबा पाटील


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले व चिखलेवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न होत आहे. या शिबीराचे Tag Line  " युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास " & रा.से.यो विभागाचे ब्रिद वाक्य " Not Me, But You".

 उद्यघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सारंगबाबा पाटील - प्रदेशाध्यक्ष, आय.टी.सेल रा.कॉ.पार्टी, श्री योगेशजी पाटणकर - संस्थापक अध्यक्ष, राजे संघर्ष प्रतिष्ठान, अध्यक्ष - श्री प्राचार्य डॉ अरूण गाडे -के.सी.कॉलेज यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रमुख उपस्थिती पुढील प्रमाणे श्री अशोक माने - आजिव सेवक सदस्य, स्वा.वि.शि.संस्था,कोल्हापूर, श्री रमेश मोरे - उपाध्यक्ष, रा.कॉ.पा.सातारा जिल्हा, श्री राजेंद्र देसाई -उपाध्यक्ष पाटण तालुका रा.कॉ.पा., श्री मारूतीराव मोळावडे - संस्थापक अध्यक्ष, जनसहकार समुह, श्री दिलीप मोरे - सरपंच चिखलेवाडी, श्री किशोर मोरे - उपसरपंच, चिखलेवाडी,  श्री सुदाम चव्हाण - सदस्य चिखलेवाडी उपस्थित होते. 

या समारंभाच्या उद्यघाटन समयी सारंग बाबा पाटील म्हणाले कि, रा.से.यो विभागाला फार मोठा इतिहास आहे.हा विभाग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानानुसार 3 H (Head,Hand & Heart) संकल्पना राबविणे गरजेचे आहे. हेच विचार स्वयंसेवकांनी आपल्या आयुष्यात राबवुन आपले जीवन परिपूर्ण करणे गरजेचे आहे. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करण्याचे मुख्य उद्देश हा रा.से.यो विभागाचे आहे .या योजनेचे ब्रीद वाक्य Not Me,But You असे आहे माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी हाच धागा पकडून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात देखील आपण आपल्या कुटुंबाचा , गावाचा ,राज्याचा आणि देशाच विचार अंगिकृत करून आपल्या आयुष्यात परिवर्तन करून आयुष्य समृद्ध करणे आवश्यक आहे तसेच कोणतेही काम करण्यास लाज वाटुन उपयोग नाही शिक्षणाशिवाय आणि संस्काराशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन सारंगबाबा पाटील यांनी उद्यघाटन प्रसंगी केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अरूण गाडे सर म्हणाले कि माझ्या महाविद्यालयाच्या रा.से.यो विभागाला फार मोठा इतिहास आहे अत्यंत दुर्गम डोंगरी भागातील मुल या गावात सात दिवस राहून स्वतः मध्ये बदल तर घडवतील तसेच समाजातील लोकांच्या मनाचा विचार करून लोकांच्या मध्ये सुध्दा परिवर्तन घडवतील त्याच वेळी हे शिबीर यशस्वीरित्या पुर्ण होईल स्वयंसेवकांनी स्वयंशिस्त पाळुन लोकांच्यात जनजागृती निर्माण करुन परिवर्तनाची लाट निर्माण करणे हीच काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ अरूण गाडे यांनी अध्यक्षीय मनोगतात केले. यावेळी समारंभात श्री. रमेश मोरे , श्री योगेश पाटणकर, श्री अशोक माने सर ,  श्री राजेंद्र देसाई इ.आपले मनोगत व्यक्त करून रा.से.यो विभागास भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा महेश चव्हाण यांनी केले , सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी  तसेच आभार प्रा संभाजी नाईक यांनी केले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, तरूण कार्यकर्ते तसेच रा.से.यो.विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.