विदयार्थी सर्वंगुण संपन्न असणे काळाची गरज:रविराज देसाई.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अॅन्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी गौरवाद्गार काढले,यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर महाविदयालयाचे  प्राचार्य श्री.ए.टी.शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी तालुकास्तरीय कराटे  स्पर्धेमध्ये कु.अनघा महापुरे,कु.प्राजक्ता सुतार,कु.वर्षा पाटसुते,कु.अक्षता शेजवळ,कु.सानिका तिकुडवे,व कु.अश्विनी तिकुडवे तसेच कुस्ती या क्रीडा प्रकारात   प्रथम क्रमांक प्राप्त केलेला किशोर डांगे  या खेळांडूचा  शालेय वह्या,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून  सत्कार करण्यात आला ,तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा,मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ,सर्व संचालक मंडळ  यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, 

या कार्यक्रमांचे प्रास्ताविकपर मनोगत प्रा.कु.रेश्मा जाधव यांनी केले,तर सुत्रसंचालन प्रा.कु.मयुरा निकम व आभार प्रा.कु.निलोफर संदे यांनी केले,या कार्यक्रमांसाठी प्राध्यापक वर्ग ,व सर्व विदयार्थी उपस्थित होते.